उद्घाटनाच्या दिवशीच ज्वेलर्समधून 1.86 लाखांचे दागिने लंपास; लोणंद शहरातील घटना : अनोळखी दोघांवर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२१ । लोणंद । खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील लक्ष्मी गोल्ड ज्वेलर्सच्या दुकानाच्या उद्घघाटनाच्या दिवशीच हातचलाखीने अनोळखी पुरुष व महिला चोरट्यांनी सुमारे 1 लाख 86 हजाराचे सोन्याचे मंगळसुत्र व चेन लंपास केली. याप्रकरणी लोणंद पोलिसांत दोघाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

लोणंद शहरातील लक्ष्मीकांचन प्लाझा या बिल्डिंगमध्ये लक्ष्मी गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानाचे 9 सप्टेंबर रोजी उद्घाटन झाले होते. त्यानंतर दि.13 दिवशी स्टॉक चेक असता एक सोन्याचे काळे मनी असलेले 14 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र व 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन दिसून आली नाही. याबाबत पै-पाहुणे यांच्याकडे चौकशी केली असता कोणीच घेतली नव्हती. 15 रोजी सीसीटीव्ही फुटेज मध्ये बारकाईने पाहिल्यानंतर. दि.9 रोजी सायंकाळी 5.34 वा ते 5.42 दरम्यान दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने गर्दीचा फायदा घेवून वैभव चोपडे व विशाल चोपडे यांना बोलण्यात गुंतवुन एक पिवळ्या रंगाचा त्यावर काळे ठिपके असलेला टॉप व निळ्या व नांरगी रंगाची ओढणी तोंडाला मास्क लावलेली अंदाजे 25 ते 26 वर्षे वयाची महीला व एक काळे रंगाचे जर्कीन त्यासमोरील बाजुला लाल व पांढर्‍या रंगाचा पट्टा असलेले व डोक्यात पुमा कंपनीचा पाढर्‍या रंगाचा ट्रेडमार्क असलेली काळे रंगाची टोपी परिधान केलेल्यासुमारे 28 ते 30 वयोगटातील पुरुष या अनोळखी दोघांनी गर्दीचा फायदा घेवुन हातचलाखीने सोन्याचे मणी मंगळसुत्र व चैन 1 लाख 86 हजाराचंचे दागिने चोरुन नेले असल्याचे दिसून आले. यानंतर लोणंद पोलीस स्टेशनला वैभव चोपडे यांनी फिर्याद दिली असुन लोणंद पोलीसांनी दोघा अनोळखी चोरटयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि विशाल वायकर करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!