दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑगस्ट २०२३ | सातारा |
एम.के. फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळवून देतो, असे सांगून ५० लाख रुपये घेवून फसणवूक केल्याप्रकरणी सातार्यातील एका महिलेसह तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नरेंद्र चंद्रकांत जाधव, सोनाली नरेंद्र जाधव (दोघे रा.शाहूपुरी, सातारा), महेश रामचंद्र जाधव (रा. सैदापूर ता.सातारा) यांच्याविरोधात किरण अधिकराव जाधव (रा. सैदापूर, ता. कराड) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना जून २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत राधिका रोड, सातारा येथे घडली आहे. इथेनॉल कंपनीबाबत वेळोवेळी कर्ज मिळवून देतो, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानुसार वेगवेगळे बहाणे करून संशयितांनी तक्रारदार यांच्याकडून ५० लाख रुपये काढून घेतले. मात्र, कर्ज मिळत नसल्याचे पाहून तक्रारदार यांनी मूळ रक्कम मागितल्यानंतर कर्ज व मूळ रक्कम न देता फसवणूक केली. यामुळे तक्रारदार यांनी वरील तिघांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.