भारतात कमोडिटी ट्रेडिंग वाढीमागील ५ कारणे


 

स्थैर्य, मुंबई, दि. २६ : एक दशकापूर्वी, सिक्युरिटी आणि एक्सचेंज साधनांमधील (स्टॉक्स, बाँड्स आणि कमोडिटीज) गुंतवणूकीकडे भारतात अनेकजण जुगाड म्हणून पाहत असत. गेल्या काही वर्षात हा दृष्टीकोन बदलला आहे. हाच गुंतवणुकदारांचा समूह आज म्युच्युअल फंड्स, स्टॉक्स आणि कमोडिटीज यासारख्या विविध साधनांमध्ये गुंतवणूक करताना दिसून येत आहे. अशा अपारंपरिक गुंतवणुकीत, विशेषत: कमोडिटीजमध्ये गुंतवणुकदारांची संख्या वेगाने का वाढते आहे याबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या.

व्यापाराचे सुलभीकरण : मागील काही वर्षांत, ब्रोकिंग फर्मद्वारे ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. गुंतवणुकदाराचा प्रवास सोपा करण्यावर या गुंतवणुकीचा भर आहे. यापूर्वी ट्रेडिंग आणि डिमॅट खाते सुरु करण्यासाठी कुठेही २ ते ३ आठवडे लागत असत. काही ठिकाणी अनेक महिने लागत असत. अग्रेसर ब्रोकरेज कंपन्यांनी हा वेळ एका तासापेक्षा कमी केला. गुंतवणुकदाराला घराबाहेर न पडताही खाते उघडता येते. नियम आधारीत इन्व्हेस्टमेंट इंजिनांची वाढ तसेच व्यापार व गुंतवणुकीत संपूर्ण तांत्रिक एकत्रिकरण झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे कमोडिटीजमध्ये ट्रेडिंग करताना गुंतवणुकदाराला कमी अडथळे येत असून माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेता येत आहेत.

महागाईविरोधात साधन : मालमत्ता वर्ग म्हणून अनुभवी माहिती सूचित करते की, इक्विटी आणि बाँड्स चलनवाढीच्या काळात चांगली कामगिरी करत नाहीत तर त्या तुलनेत कमोडिटीज उत्तम कामगिरी करतात. इक्विटीज आणि कमोडिटीज यांमध्येही परस्पर विरोधी संबंध आहे. त्यामुळे बाजारातील गतिशीलतेविरुद्ध ससाधन म्हणून गुंतवणूकदार कमोडिटीजचा वापर करतात. इक्विटी, कमोडिटीज आणि बाँड्सच्या संमिश्र पोर्टफोलिओमध्ये कमोडिटी इतर साधनांच्या तुलनेत चांगली कामगिरी करतात.

मिलेनिअल गुंतवणूकदार : भारत हा तरुणांचा एक मोठा समूह असून येथील बहुतांश लोकसंख्या ४० वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. हे मिलेनिअल गुंतवणूदार उत्तम वाचक आणि उच्च शिक्षित आहेत. हे गुंतवणूकदार रिअल इस्टेट आणि बँकांतील ठेवी यासारख्या पारंपरिक गुंतवणूक साधनांच्या पलिकडे जाऊन गुंतवणूक करण्याचा आत्मविश्वास बाळगतात. हंगामी मागणीनुसार, योग्य परतावा मिळवण्यासाठी ते कमोडिटीजसारख्या पर्यायी साधनांकडे पहात आहेत.

बँकिंग पर्यायांचा वापर : भारतातील बँकांकडे कमोडिटीजसाठी चांगला एक्सपोजर आहे. तो अजूनही वाढत आहे. बँकांनी वाढवलेले खाद्यान्न कर्ज हे याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा आणि इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट (ई-एनडब्ल्यूआर) या प्रकारच्या संस्थात्मक उपायांनी सर्व भागधारकांचे हित संरक्षित केले आहे. त्यामुळे बँकांना कमोडिटी ट्रेडिंगमध्ये त्यांचे कव्हरेज वाढवण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. विशेषत: कोव्हिडनंतरच्या परिस्थितीत बँकिंग पर्यायांचा वापर करत कमोडिटी क्षेत्रात रिटेल गुंतवणूकदारांचा सहभाग वाढला आहे.

नियम आधारीत गुंतवणूक : कमोडिटीजची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते. यात कृषी उत्पादने, निर्मिती उत्पादने, निर्यात, पाऊस आणि इत्यादी घटकांचा समावेश होतो. या घटकांद्वारे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीसाठी अंदाज लावता येतो. सध्याच्या काळात, अत्याधुनिक ब्रोकरेज संस्था नियम आधारीत पद्धतीद्वारे अत्याधुनिक इन्व्हेस्टमेंट इंजिनची सुविधा प्रदान करत आहेत. हे गुंतवणूक इंजिन एखादी शिफारस करण्यापूर्वी १ अब्जांपेक्षा जास्त डाटा पॉइंट्सचे विश्लेषण करतात. केवळ बटणाला स्पर्श करून कमोडिटीजमध्ये गुंतवणूक करण्याचा आनंद गुंतवणूकदारांना मिळत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!