दैनिक स्थैर्य | दि. १७ एप्रिल २०२३ | फलटण |
सद्गुरू संतवर्य योगीराज श्री शिवाजी महाराजांचा ४९ वा पुण्यतिथी सोहळा योगीराज सद्गुरू श्री शिवाजी महाराज समाधी मंदिर फाटा नंबर २५, सर्वे नंबर ९२, विडणी, ता. फलटण, जि. सातारा येथे शुक्रवार, दि. २१ एप्रिल २०२३ ते मंगळवार, दि. २५ एप्रिल २०२३ अखेर संपन्न होत आहे.
या उत्सव काळात अखंड नामस्मरण, गुरूचरित्र वाचन, शंकर गीता वाचन, पोथी पठण, असे धार्मिक वाचन सुरू राहील.
उत्सव सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे ५.०० वाजता काकड आरती, सकाळी ७.०० वाजता रुद्राभिषेक, शुक्रवार, दि. २१ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता गुरूचरित्र वाचनास प्रारंभ होणार असून दुपारी १२.०० वाजता आरतीचा कार्यक्रम तसेच सायंकाळी ६.०० वाजता हरिपाठ व अखंड विना पूजन करून श्रींच्या महोत्सवास सुरुवात होईल. सायंकाळी ७.०० वाजता आरती होईल.
शनिवार, दि. २२ एप्रिल २०२३ मुख्य दिवस अक्षयतृतीया, दुपारी १२.०० वाजता श्रींची महाआरती व आरती झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी २.०० ते ५.०० दरम्यान ओम दत्त चिले ओम भजनी मंडळाचे भजन होईल. सायंकाळी ६.०० वाजता हरिपाठ, सायंकाळी ७.०० वाजता श्रींचा भव्य आणि दिव्य असा पालखी सोहळा संपन्न होणार आहे. पालखी सोहळा झाल्यानंतर आरती होईल व उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात येईल.
रविवार, दि. २३ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता श्रींची आरती, सायंकाळी ६.०० वाजता हरिपाठ, रात्री ८.०० वाजता भजन होईल.
सोमवार, दि. २४ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता श्रींची आरती, सायंकाळी ६.०० वाजता हरिपाठ, सायंकाळी ७.०० वाजता आरती, रात्री ८.०० वाजता हभप संतोष महाराज भादिगे (पानस) यांचे कीर्तन होईल .
मंगळवार, दि. २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता गुरूचरित्र वाचन समाप्ती, सकाळी ९.०० वाजता हभप डॉ. योगेश महाराज नाळे यांचे काल्याचे किर्तन तसेच सकाळी ११.०० वाजता ध्वजारोहण, दुपारी १२.०० वाजता श्रींची महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. श्री सद्गुरू शिवाजी महाराज यांच्या सर्व भक्त जणांनी कार्यक्रमात सक्रिय होऊन श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सद्गुरू शिवाजी महाराज मठाचे मठाधिपती श्री. जयवंतराव कर्वे यांनी केले आहे.