
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि.२३: विसावा येथील एका अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्याने एका घरातून 44 हजारांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशीश गणेश सुरेश चव्हाण रा. अपूर्वा अपार्टमेंट, विसावा नाका यांच्या घरात दि. 21 रोजी रात्री 11च्या सुमारास अज्ञात चोरट्याने येवून लाकडी टेबल शेजारी ठेवलेली बॅगमधील रोकड, कागदपत्रे, दुरस्तीला आलेला मोबाईल, असा 44 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो. ना. जाधव करत आहेत.
