निष्काळजीपणे वाहन चालवून प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या चालकाला 4 वर्षे सक्तमजुरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१: खंबाटकी घाटात एकेरी वाहतूक असताना विरुद्ध दिशेने लक्झरी बस भरधाव वेगाने चालवल्याने अपघातास होवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी 45 प्रवाशी जखमी झाल्याप्रकरणी चालकाला जिल्हा न्यायालयाने चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विजय एकनाथ चोरगे वय 29, रा. येवती, ता. कराड असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, चालक विजय चोरगे हा लक्झरी बस (एमएच – 04 जीपी 3535) मुंबई ते चांदोली अशी घेऊन जात होता. त्यावेळी बस खंबाटकी घाटात एकेरी वाहतुक होती. बस विरुद्ध दिशेने नेल्यास अपघात होवू शकतो, हे माहित असूनही चोरगे याने बस विरुद्ध दिशेने बोगदयाकडे भरधाव वेगात चालवली. या बसने समोरुन येणार्‍या लक्झरी बस (एमएच 07 जीपी 9777) ला समोरुन धडक दिली. या अपघातामध्ये दिपक शिवाजी निकम वय 40 वर्ष यांचा मृत्यू झाला तर दोन्ही बसमधील 45 प्रवाशी किरकोळ व गंभीर जखमी झाले. दोन्ही लक्झरीचे चार लाखांचे नुकसान झाले. या घटनेला स्वतः कारणभूत असूनही चोरगे याने अपघाताची खबर पोलीसांना न देता व जखमींना औषधोपचारास न नेता पसार झाला.

दरम्यान, या अपघाताची फिर्याद खंडाळा पोलीस ठाण्यात दि. 22 नोव्हेंबर 2014 रोजी 10.21 वाजता दाखल करण्यात आली होती. तपास अधिकारी पोनि ए. बी. शेळके यांनी गुन्हयाचा उत्कृष्ट तपास करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावे तसेच शास्त्रोक्त पुरावा प्राप्त करुन मुदतीत न्यायालयामध्ये दोषारोप पत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा न्यायाधिश आर.डी. सावंत यांच्या न्यायालयामध्ये झाली. दि. 31 मार्च 2021 रोजी न्यायालयाने आरोपी विजय एकनाथ चोरगे वय 29 वर्ष रा. येवती ता. कराड यास भा.द.वि.स कलम 304 (2) अन्वये 4 वर्ष सक्तमजुरी व 2 हजार दंड, दंड न दिलेस 1 महिना साधी कैद, 279 अन्वये 3 महिने सक्तमजुरी व 500 दंड, दंड न दिलेस 8 दिवस साधी कैद, 337 अन्वये 3 महिने सक्त मजुरी व 500 रुपये दंड दंड न दिलेस 8 दिवस साधी कैद. 368 अन्वये 1 वर्ष सक्तमजुरी व 500 रु. दंड, दंड न दिलेस 8 दिवस साधी कैद, मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये 1 वर्ष सक्तमजुरी व रू 500 रु. दंड, दंड न दिलेस 8 दिवस साधी कैद. मो.वा.का.क 134 (1) (अ) (ब) अन्वये 100 रुपये दंड दंड न दिलेस 2 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

सुनावणीमध्ये सरकारी अभियोक्ता म्हणून आशीर्वाद कुलकर्णी सो (सहा.सरकारी वकील सो) यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सोमनाथ कुंभार (पो.कॉ. 1725) खंडाळा पोलीस स्टेशन, प्रॉसिक्युशन स्क्वॉड, सातारा अधिकारी राजेंद्र यादव (पोलीस उपनिरीक्षक), अंमलदार स. पो. उप.नि. श्रीमती घारगे, हवा शेख, बंद्रे, शिंदे, शेख, कुंभार, घोरपडे, भरते यांनी सरकारी वकील यांना योग्य ते सहकार्य केले व साक्षीदारांना योग्य ते मार्गदशन केले.


Back to top button
Don`t copy text!