
स्थैर्य, लोणंद, दि. 13 जुलै : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणंद पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत २४ सराईत आरोपींना फलटण व खंडाळा तालुक्यातून हद्दपारीचा आदेश दिला आहे.
दाचा पालखी सोहळा शांततापूर्ण, सुरक्षित व निर्विघ्न वातावरणात पार पडावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने जिल्हा पोलिस दलाकडून व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. पालखी मार्गावर व परिसरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याची शक्यता असलेल्या चोरी, अवैध दारू विक्री, मारामारी व इतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक
कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, फलटणचे पोलिस उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी लोणंद पोलिस ठाण्यास सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने लोणंद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हे दाखल असलेल्या व कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करण्याची शक्यता असलेल्या २४ जणांना उद्यापासून (सोमवार) १९ जुलैपर्यंत फलटण व खंडाळा तालुक्याच्या हद्दीत वावरण्यास मनाई (प्रवेशबंदी) आदेश दिला आहे. यामध्ये वैभव गोपाळ गोवेकर (रा. कोरेगाव, ता. फलटण), मच्छिंद्र एकनाथ जाधव (मिरेवाडी, ता. फलटण), अतुल पोपट जाधव (रा. गोटेमाळ, लोणंद), धीरज संजय गिरी (रा. येळेवाडी, ता. खंडाळा), सूरज संतोष खुंटे (रा. आंदोरी, ता. खंडाळा), मुकेश हायस्कूल भोसले (रा. आदर्की बुद्रुक, ता. फलटण), शुभम शरद कोकरे (रा. मिरेवाडी), रोहित सदानंद शेळके (रा. निंबोडी, ता. खंडाळा), अनिकेत जालिंदर माने (रा. ठोंबरे मळा, लोणंद), विशाल भारत घोणे (रा. लोणंद), नितीन मोहन गायकवाड (रा. झणझणे, सासवड, ता. फलटण), मैना बापू मदने, मंगल लाला मदने (रा. तरडगाव), यमुना सुभाष नवले,
ज्योती अमित गाडे (रा. पाडेगाव), ममता विलास काळे (रा. बाळासाहेब नगर, लोणंद), विलास चांगदेव काळे, मधुकर निवृत्ती घोरपडे (रा. लोणंद), बाळुबाई विठ्ठल बोडरे (रा. तडवळे, ता. फलटण), राणी तानाजी राठोड (रा. ठोंबरे मळा, लोणंद), अलका पोपट डबडे (रा. इंदिरा नगर, लोणंद), विकास दशरथ क्षीरसागर (रा. लोणंद), प्रमिला गांधी राठोड, विजय अनंता राठोड (रा. बाळासाहेब नगर). या कारवाईत पोलिस हवालदार नितीन भोसले, महिला पोलिस कॉन्स्टेबल स्नेहल कापसे, भारती मदने, सोनाली मोहिते, पोलिस अंमलदार अवधूत धुमाळ तसेच होमगार्ड सचिन निकम, रब्बानी शेख आणि ऐश्वर्या गायकवाड यांनी सक्रिय सहभाग घेतला.
