पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी सातारा शहरात 23 मतदान केंद्रे


 


स्थैर्य, सातारा, दि.३० : शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी सातारा शहरात 23 मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली असून निवडणुकीच्या कामासाठी सुमारे एक हजार 56 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिक्षक व पदवीधरसाठी जिल्ह्यात 176 मतदान केंद्रे निश्‍चित करण्यात आली असून “शिक्षक’साठी 44 तर, “पदवीधर’साठी 132 केंद्रे असणार आहेत. या निवडणुकीत “पदवीधर’साठी कऱ्हाड तालुक्‍यात मतदारांची संख्या जास्त असल्याने सर्वाधिक 40 केंद्रे कऱ्हाड तालुक्‍यात असणार आहेत. तर, सर्वांत कमी दोन केंद्रे ही महाबळेश्‍वर व जावळी तालुक्‍यांसाठी ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर “पदवीधर’साठी खंडाळा तालुका 4, खटाव- 9, कोरेगाव- 9, माण- 7, पाटण- 11, फलटण- 16, वाई तालुक्‍यात 7 मतदान केंद्रे निश्‍चित केली आहेत. “शिक्षक’साठी जावळी तालुका 2, कऱ्हाड- 8, खंडाळा- 2, खटाव-4, कोरेगाव- 4, महाबळेश्‍वर- 2, माण-2, पाटण- 7, फलटण-4, सातारा- 7, वाई तालुक्‍यासाठी 2 मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. सातारा तालुक्‍यात एकूण 25 मतदान केंद्रे असून 23 शहरांसाठी, तर 2 केंद्रे नागठाणे या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.

या निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर सात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर आरोग्य विभागाचे एकूण 201 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!