कास्टिंग डायरेक्टरविरोधात गुन्हा दाखल : अभिनेत्रीला लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्ष केला बलात्कार


 

स्थैर्य, मुंबई, दि.३०: टीव्ही आणि वेब सीरिजमध्ये काम
करणाऱ्या एका अभिनेत्रीने कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर बलात्काराचा
आरोप केला आहे. याप्रकरणी आयुष तिवारीविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलिस
स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अद्याप आयुष तिवारीकडून
कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. आयुषने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवत
वारंवार बलात्कार केल्याचे या अभिनेत्रीने दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत
म्हटले आहे. इतकेच नाही तर मागील काही दिवसांपासून पोर्न व्हिडिओ पाठवून तो
त्रास देत असल्याचेही तिने म्हटले आहे.

मागील दोन वर्षांपासून आरोपीला ओळखते पीडिता
वर्सोवा
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून पीडितेचा जबाब नोंदवला आहे.
पोलिसांनी समन्स बजावून आयुष तिवारीला पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर
राहण्यास सांगितले आहे. लग्नाचे आमिष दाखवून आयुषने पीडित अभिनेत्रीवर
वारंवार बलात्कार केला. त्यानंतर पीडिता गर्भवती राहिली. मात्र, आयुषने
तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे या अभिनेत्रीने पोलिसांकडे धाव
घेत आयुषविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडिला आरोपीला मागील दोन
वर्षांपासून ओळखत होती. 25 नोव्हेंबर रोजी वर्सोवा पोलिस ठाण्यात आयुष
विरोधात तक्रार दाखल झाली असून त्याच्यावर कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.

पोर्न व्हिडिओ दाखवून बलात्कार केल्याचा आरोप
दरम्यान,
आयुषने या पीडित अभिनेत्रीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दोन वर्ष
बलात्कार केला. मात्र, ऐनवेळी त्याने लग्न करण्यास नकार दिला, अशी माहिती
वर्सोवा पोलीस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. पोर्न व्हिडिओ
दाखवून बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने आरोपी आयुष तिवारीवर लावला आहे.

पीडितेने
आपल्या तक्रारीत म्हटले, ‘आयुष अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर बलात्कार
करायचा. काही दिवसांपासून तिने आयुषची साथ सोडली. त्याच्यापासून वेगळे
झाल्यानंतर तो मोबाइलवर अश्लील क्लिप पाठवत राहिला.’ आरोपी आपल्याला मारहाण
करत असल्याचेही पीडितेने म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!