दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२१ । मुंबई । भिलार, उंबरी, धावली, आलेवाडी खिंड, रेंडीमुरा, कुंभारगणी, मोरखिंड या प्रमुख जिल्हा मार्ग ६८ मधील मरडमुरा फाटा ते मरडमुरा या रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून २ कोटी २७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
जावली तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ असून या भागात दळणवळणाच्या सुविधा अधिक सुकर होण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्राधान्य दिले आहे. जावली तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या भिलार, उंबरी, धावली, आलेवाडी खिंड, रेंडीमुरा, कुंभारगणी, मोरखिंड या प्रजिमा ६८ मधील मरडमुरा फाटा ते मरडमुरा या रस्त्याचे रुंदीकरण करणे अत्यावश्यक होते. रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होत होती. या मार्गावर वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी मरडमुरा फाटा ते मरडमुरा या रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध झाला आहे.
५०५४/०४ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मरडमुरा फाटा ते मरडमुरा या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला असून रस्त्यावरील मोऱ्या, छोटे पूल बांधणे यासह रुंदीकरण, खडीकरण आणि डांबरीकरण केले जाणार आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार असून काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित आणि निर्धोक होण्यास मदत होणार आहे. तसेच या रस्त्यामुळे रेंडीमुरा, कुंभारगणी, मरडमुरा आदी भागातील दळणवळण सोयीचे होणार आहे. सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून काम लवकर सुरु करून वेळेत पूर्ण करावे तसेच काम दर्जेदार करावे, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.