
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । सातारा । बँकेमध्ये पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने अज्ञात चोरट्याने १८ हजार ५०० रुपये लंपास केल्याची घटना मेढा, ता. जावली येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ ऑक्टोंबर रोजी १०.४० वाजण्याच्या सुमारास मेढा येथील बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये श्रीपती हरी जवळ वय ८० राहणार जवळवाडी, ता. जावली यांनी आपल्या बचत खात्यातून काढलेले २५ हजार रुपये बँकेमध्ये मोजत असताना एक अनोळखी इसम त्या ठिकाणी आला. मी तुम्हाला पैसे मोजून देतो असे सांगून त्यांच्याकडील १८ हजार ५०० रुपये घेऊन तो निघून गेल्याची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
