फलटण तालुक्यात 147 कोरोनाबाधित; मागील चाचण्या अपडेट करण्याचे काम सुरु असल्याने नागरिकांनी घाबरून जावू नये : प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. २६ : सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या हि आटोक्यात आलेली आहे. मात्र मागील चाचण्या ICMR पोर्टलवर अपडेट करण्याचे काम प्रलंबीत होते. ते सध्या सुरु असल्याने पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या १०७१ अशी दाखवली जात आहे. मात्र कालची प्रत्यक्ष पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या १४७ आहे. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये परंतु कोरोनाला आपल्या तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी केलेले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!