बारावीच्या परीक्षेत फलटण तालुक्यातील १४७ विद्यार्थी उच्च श्रेणीत पास; ९०.९६ टक्के निकाल


दैनिक स्थैर्य | दि. २२ मे २०२४ | फलटण |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. फलटण तालुक्यातून या परीक्षेस ३०२३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी उच्च श्रेणीत १४७, प्रथम श्रेणीत ६२१, द्वितीय श्रेणीत १४१९, उत्तीर्ण श्रेणीत ५६३ असे एकूण २७५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून फलटण तालुक्याचा निकाल ९०.९६ टक्के लागला आहे.

मुधोजी महाविद्यालय, फलटण येथून ४५६ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी उच्च श्रेणीत १४, प्रथम श्रेणीत ५०, द्वितीय श्रेेणीत २२५ आणि उत्तीर्ण श्रेेणीत १२८ असे एकूण ४१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ९१.४४ टक्के लागला आहे.

मुधोजी महाविद्यालय शास्त्र शाखा १५७ पैकी १५६ उत्तीर्ण, निकाल ९९.३६ टक्के, कला शाखा २११ पैकी १७६ उत्तीर्ण, निकाल ८३.४१ टक्के, वाणिज्य शाखा ८८ पैकी ८५ उत्तीर्ण, निकाल ९६.५९ टक्के.

सरदार वल्लभभाई कनिष्ठ महाविद्यालय, साखरवाडी येथून ६३ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी उच्च श्रेेणीत ०, प्रथम श्रेेणीत ७, द्वितीय श्रेेणीत २४ आणि उत्तीर्ण श्रेेणीत १७ असे एकूण ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ७६.१९ टक्के लागला आहे.

या महाविद्यालयातून कला शाखा ३० पैकी १५ उत्तीर्ण, निकाल ५०.०० टक्के, वाणिज्य शाखा ३३ पैकी ३३ उत्तीर्ण, निकाल १००.०० टक्के.

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून ४८६ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी उच्च श्रेेणीत ११, प्रथम श्रेेणीत ५५, द्वितीय श्रेेणीत २०८ आणि उत्तीर्ण श्रेेणीत १६१ असे एकूण ४३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ८९.५० टक्के लागला आहे.

या महाविद्यालयातून शास्त्र शाखा २०६ पैकी २०० उत्तीर्ण, निकाल ९७.०८ टक्के, कला शाखा १९२ पैकी १५२ उत्तीर्ण, निकाल ७९.१६ टक्के, वाणिज्य शाखा ८८ पैकी ८३ उत्तीर्ण, निकाल ९४.३१ टक्के.

मुधोजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून ७८७ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी उच्च श्रेेणीत ७०, प्रथम श्रेेणीत २४४, द्वितीय श्रेेणीत ३७८ आणि उत्तीर्ण श्रेेणीत ७२ असे एकूण ७६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ९७.०७ टक्के लागला आहे.

या महाविद्यालयातून शास्त्र शाखा ४६३ पैकी ४५७ उत्तीर्ण, निकाल ९८.७० टक्के, कला शाखा ८७ पैकी ७७ उत्तीर्ण, निकाल ८८.५० टक्के, वाणिज्य शाखा २३७ पैकी २३० उत्तीर्ण, निकाल ९७.०४ टक्के.

मालोजीराजे शेती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून शास्त्र शाखा ५८६ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी उच्च श्रेेणीत २८, प्रथम श्रेेणीत १५७, द्वितीय श्रेेणीत ३२२ आणि उत्तीर्ण श्रेेणीत ६८, असे एकूण ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ९८.१२ टक्के लागला आहे.

छ. शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, गिरवी येथून कला शाखेचे २१ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी उच्च श्रेेणीत १, प्रथम श्रेेणीत ३, द्वितीय श्रेेणीत ६ आणि उत्तीर्ण श्रेेणीत ६ असे एकूण १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ७६.१९ टक्के लागला आहे.

सौ. वेणूताई चव्हाण कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून कला शाखेच्या ६५ विद्यार्थीनी परीक्षेस बसल्या. त्यापैकी उच्च श्रेेणीत २, प्रथम श्रेेणीत ७, द्वितीय श्रेेणीत २८ आणि उत्तीर्ण श्रेेणीत १९ अशा एकूण ५६ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या असून महाविद्यालयाचा निकाल ८६.१५ टक्के लागला आहे.

ज्योतिर्लिंग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पवारवाडी (आसू) येथून कला शाखा ३९ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी उच्च श्रेेणीत ०, प्रथम श्रेेणीत ३, द्वितीय श्रेेणीत ९ आणि उत्तीर्ण श्रेेणीत ५ अशा एकूण १७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून महाविद्यालयाचा निकाल ४३.५८ टक्के लागला आहे.

फलटण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून कला शाखा २१ विद्यार्थी परीक्षेस बसल्या. त्यापैकी उच्च श्रेणीत ०, प्रथम श्रेेणीत १, द्वितीय श्रेेणीत ६ आणि उत्तीर्ण श्रेेणीत ४ अशा एकूण ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ५२.३८ टक्के लागला आहे.

जय भवानी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तिरकवाडी येथून कला शाखा २४ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी उच्च श्रेेणीत ०, प्रथम श्रेेणीत ४, द्वितीय श्रेेणीत १० आणि उत्तीर्ण श्रेेणीत ७ असे एकूण २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ८७.५० टक्के लागला आहे.

सरस्वती माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बिबी येथून कला शाखा २६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी उच्च श्रेेणीत ०, प्रथम श्रेेणीत ९, द्वितीय श्रेेणीत ४ आणि उत्तीर्ण श्रेेणीत ५ असे एकूण १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ६९.२३ टक्के लागला आहे.

हनुमान माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोखळी येथून कला शाखा १५ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी उच्च श्रेणीत ०, प्रथम श्रेेणीत २, द्वितीय श्रेेणीत ४ आणि उत्तीर्ण श्रेेणीत ३ असे एकूण ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ६०.०० टक्के लागला आहे.

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, मलठण (फलटण) येथून कला शाखा २५ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी उच्च श्रेेणीत ०, प्रथम श्रेेणीत ३, द्वितीय श्रेेणीत ८ आणि उत्तीर्ण श्रेेणीत ७ असे एकूण १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ७२.०० टक्के लागला आहे.

म. फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सासवड येथून कला शाखा २८ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी उच्च श्रेणीत ०, प्रथम श्रेेणीत ३, द्वितीय श्रेेणीत १० आणि उत्तीर्ण श्रेेणीत १० असे एकूण २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ८२.१४ टक्के लागला आहे.

सरलष्कर बहाद्दर बाबाराजे खर्डेकर कनिष्ठ महाविद्यालय, हणमंतवाडी येथून कला शाखा २१ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी उच्च श्रेेणीत ०, प्रथम श्रेेणीत ०, द्वितीय श्रेेणीत ५ आणि उत्तीर्ण श्रेेणीत ४ असे एकूण ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ४२.८५ टक्के लागला आहे.

हणमंतराव पवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून कला शाखा २५ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी उच्च श्रेेणीत ०, प्रथम श्रेेणीत १, द्वितीय श्रेेणीत ९ आणि उत्तीर्ण श्रेेणीत ८ असे एकूण १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ७२.०० टक्के लागला आहे.

मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, बरड येथून कला शाखा ३१ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी उच्च श्रेेणीत १, प्रथम श्रेेणीत ४, द्वितीय श्रेेणीत ६ आणि उत्तीर्ण श्रेेणीत ९ असे एकूण २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ६४.५१ टक्के लागला आहे.

श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल ज्युनिअर कॉलेज जाधववाडी येथून शास्त्र शाखा ४४ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी उच्च श्रेेणीत २, प्रथम श्रेेणीत ११, द्वितीय श्रेेणीत २९ आणि उत्तीर्ण श्रेेणीत १ असे एकूण ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ९७.७२ टक्के लागला आहे.

वेणूताई चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तरडगाव येथून एकूण ३१ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी उच्च श्रेणीत ०, प्रथम श्रेेणीत १, द्वितीय श्रेेणीत ११ आणि उत्तीर्ण श्रेेणीत १३ असे एकूण २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल ८०.६४ टक्के लागला आहे.

या महाविद्यालय कला शाखेतून १८ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी १३ उत्तीर्ण झाले असून निकाल ७२.२२ टक्के तर वाणिज्य शाखेतून १३ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी १२ उत्तीर्ण झाले निकाल ९२.३० टक्के लागला आहे.

श्री जानाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, राजाळे येथून एकूण १७ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी उच्च श्रेेणीत ०, प्रथम श्रेेणीत ५, द्वितीय श्रेेणीत ७ आणि उत्तीर्ण श्रेेणीत ५ असे एकूण १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल १००.०० टक्के लागला आहे.

या महाविद्यालय कला शाखेतून ८ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी ८ उत्तीर्ण झाले असून निकाल १००.०० टक्के तर वाणिज्य शाखेतून ९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ९ उत्तीर्ण झाले निकाल १००.०० टक्के लागला आहे.

अ‍ॅम्बीशन इंग्लिश मिडीयम स्कूल ज्युनिअर कॉलेज, आदर्की येथून एकूण ६० विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी उच्च श्रेेणीत ९, प्रथम श्रेेणीत १४, द्वितीय श्रेेणीत ३४ आणि उत्तीर्ण श्रेेणीत ३ असे एकूण ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल १००.०० टक्के लागला आहे.

या महाविद्यालय शास्त्र शाखेतून ३२ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३२ उत्तीर्ण झाले असून निकाल १००.०० टक्के तर वाणिज्य शाखेतून २८ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २८ उत्तीर्ण झाले निकाल १००.०० टक्के लागला आहे.

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कोळकी (फलटण) येथून वाणिज्य शाखेचे ९ विद्यार्थी परीक्षेस बसले. त्यापैकी उच्च श्रेेणीत ५, प्रथम श्रेेणीत ४, द्वितीय श्रेेणीत ० आणि उत्तीर्ण श्रेेणीत ० असे एकूण ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल १००.०० टक्के लागला आहे.

हाजी अब्दुल राजन उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून कला शाखेचे २ विद्यार्थी परीक्षेस बसले. ते दोघे उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

सरदार वल्लभभाई कनिष्ठ महाविद्यालय, साखरवाडी येथून ४ विद्यार्थी व्होकेश्रे्नल परीक्षेस बसले ते सर्व द्वितीय श्रेेणीत उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

यशवंतराव चव्हाण कॉलेज फलटण येथून व्होकेशनल परीक्षेस ५३ विद्यार्थी बसले. त्यापैकी प्रथम श्रेणीत ६ द्वितीय श्रेेणीत २९ उत्तीर्ण श्रेणीत ५ असे एकूण ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७५.४७ टक्के लागला आहे.

मुधोजी हायस्कूल फलटण येथून व्होकेशनल परीक्षेस ३८ विद्यार्थी बसले. त्यापैकी प्रथम श्रेेणीत १२ द्वितीय श्रेेणीत २३ उत्तीर्ण श्रेेणीत ० असे एकूण ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९२.१० टक्के लागला आहे.

मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथून व्होकेशनल परीक्षेस २० विद्यार्थी बसले. त्यापैकी प्रथम श्रेणीत ४ द्वितीय श्रेेणीत ११ उत्तीर्ण श्रेेणीत ० असे एकूण १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७५.०० टक्के लागला आहे.

वेणूताई चव्हाण कन्या कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून व्होकेशनल परीक्षेस २६ विद्यार्थी बसले. त्यापैकी उच्च श्रेेणीत ४, प्रथम श्रेेणीत ११ द्वितीय श्रेेणीत ९ उत्तीर्ण श्रेेणीत १ असे एकूण २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९६.१५ टक्के लागला आहे.


Back to top button
Don`t copy text!