फलटण तालुक्यात ७४ ग्रामपंचायतीसाठी १२७० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात; तालुक्यातील ६ ग्रामपंचायती बिनविरोध

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
स्थैर्य, फलटण, दि.५ : फलटण तालुक्यात 80 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याची अंतिम दिवशी 970 उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणात प्रत्यक्ष 1270 एवढे उमेदवार उभे आहेत. तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर 138 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
फलटण तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तब्बल 2408 अर्ज दाखल झालेले होते. 26 अर्ज बाद झाल्याने 80 जागांसाठी 2378 उमेदवार उभे होते. आज अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी 970 एवढ्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 74 ग्रामपंचायतीसाठी 1270 एवढे उमेदवार रिंगणात आहेत तालुक्यातील डोंबाळवाडी, काशीदवाडी, वाघोशी, तडवळे ,रावडी खु।।, ढवळेवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!