
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि.१६: चिखली, ता. सातारा येथील पवन चक्कीच्या टॉवरची 12 हजार रुपयांची तांब्याची तार चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेसचे सुरक्षा अधिकारी दीपक घाडगे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. यामध्ये म्हटले आहे की, दि. 12 रोजी रात्री 6 ते दि. 13 रोजी सकाळी 6 वाजल्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या चिखली येथील टॉवर नं. 30 या पवनचक्कीच्या काळ्या रंगाचे जाड कोटींग असणारी तांब्याची 12 हजार रुपयांची तार चोरून नेली. याप्रकरणी हवालदार बर्गे तपास करत आहेत.
