मूकबधिर विद्यालयाचा दहावी निकाल 100 टक्के


दैनिक स्थैर्य । 15 मे 2025। फलटण । महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयाने इयत्ता दहावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली.

मूकबधीर विद्यार्थ्यांना नॉर्मल मुलांपेक्षा परीक्षेची वेळ अर्धा तास जास्त असते. परंतु या शाळेतील ज्यांना ऐकताही येत नाही व बोलताही येत नाही अशा मूकबधीर विद्यार्थ्यांनी नॉर्मल मुलांचा अभ्यास घेऊन ही मुले इयत्ता दहावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. या यशाबद्दल येथील शिक्षक वर्गाचे विशेष कौतुक होत आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विनोद हाके, कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, सचिव सौ. वैशाली चोरमले, मुख्याध्यापिका सौ. वैशाली शिंदे, उपशिक्षिका सौ. हेमा गोडसे, सौ. विजया मठपती, उदय निकम शिक्षकेतर कर्मचारी चेतन खरात, नितेश शिंदे व मनीषा चोरमले यांनी अभिनंदन केले.

मूकबधिर विद्यालयाला इयत्ता 7 वीपर्यंतच शासनाची मान्यता आहे. त्यामुळे 7 वी नंतर या मुलांना उच्च शिक्षण घेता येत नव्हते. या परिस्थितीचा विचार करून संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, सचिव सौ. वैशाली चोरमले यांनी दहावीचे वर्ग सुरू करण्यासाठी विना मोबदला ज्यादा शिक्षक नेमले. मूकबधिर मुलांना पुढील शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
सौ. वैशाली शिंदे, मुख्याध्यापिका

 


Back to top button
Don`t copy text!