‘गोखळी बंद’ला १०० टक्के प्रतिसाद


दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवत पुकारण्यात आलेल्या ‘जिल्हा बंद’ला गोखळी (फलटण) गावातील सर्व व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून ‘गोखळी बंद’ १०० टक्के यशस्वी केला.

नेहमी गजबजलेल्या गोखळी पाटी येथील बाजारपेठेत बंदमुळे शुकशुकाट होता. गोखळी गावामध्ये राजकीय पुढार्‍यांना ‘गाव बंदी’ करण्यात आली आहे. गोखळी पाटी चौकात बॅनर लावण्यात आला आहे. गोखळी येथील मराठा क्रांती मोर्चातर्फे बंदचे आवाहन करण्यात आले होते. बंदला गोखळी आणि परिसरातून सर्व समाजातील समाजबांधवांनी बंदमध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला.


Back to top button
Don`t copy text!