‘फलटण बंद’मुळे फलटण एस. टी. आगार ठप्प


दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
आज मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी ‘फलटण बंद’चे आवाहन केले होते. बंदचे आवाहन लक्षात घेऊन व खबरदारी म्हणून फलटण आगारातून आज एकही बस सोडण्यात आली नाही. लांब पल्ल्याच्या बसेस ही आगारात उभ्या होत्या. एकूण १८९ फेर्‍या रद्द करण्यात आल्या. अंदाजे बसचे १७५५४ किलो मीटर रद्द झाले. त्यामुळे फलटण आगाराचे अंदाजे ३.५ ते ३.७५ लाख उत्पन्न बुडाले, अशी माहिती प्रभारी आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांनी दिली.

प्रवाशांच्या व बसेसच्या सुरक्षेसाठी आज फलटण आगार पूर्ण बंद होता. फलटण आगाराच्या कोणत्याही बसचे नुकसान झाले नाही. तसेच फलटण हद्दीत इतर आगाराच्या कोणत्याही बसेसचे नुकसान झाले नाही, असेही नाईक यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!