शेतकऱ्यांना बियाणांसाठी ५० टक्के अनुदान योजना


दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२२ । सातारा । जिल्हा परिषद सेस २०२२-२३ अंतर्गत प्राधान्याने अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, अपंग शेतकरी, मागासवर्गीय शेतकरी व इतर शेतकऱ्यांना सोयाबिण, भात इ. पिकाच्या बियाणांसाठी बियाणे किमतीच्या ५० टक्के अनुदान थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने देण्यात येणार असल्याचे पाटणचे गट‍विकास अधिकारी   मिना साळुंखे यांनी कळविले आहे.

या योजनेनुसार एकाच पिकाच्या बियाणासाठी लाभ देय राहणार आहे. तसेच योजनेचा दुबार लाभ देता येणार नाही. अधिकृत विक्रेत्याकडून गुणवत्तेसह बियाणे खरेदी करुन बिल कार्यालयास सादर केल्यानंतर 50 टक्के अनुदान लाभार्थीच्या खात्यावर जमा करणार असल्याने पात्र लाभार्थींनी परिपूर्ण प्रस्ताव पंयाचत समिती कार्यालयास सादर करावे.


Back to top button
Don`t copy text!