वसुली विभागाचे दोन मदतनीस लाचलुचपत च्या जाळ्यात; पाच हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०४ जून २०२२ । सातारा । सातारा सातारा पालिकेच्या वसुली विभागाच्या दोन मदतनीसांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत च्या प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता महसूल विभागाच्या दालन परिसरात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

चतुर्थ वार्षिक पाहणीच्या पाहणी पत्रकात भाडेकरूची नोंद न घालण्यासाठी ही लाच घेताना कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे या प्रकारामुळे सातारा पालिका कर्मचाऱ्यांच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे विनायक सहस्त्रबुद्धे वय 53 रा सातारा व प्रदीप ऊर्फ बाळू कदम वय 57 राहणार व्यंकटपुर पेठ अशी संबंधित लिपिकांची नावे आहेत . संबंधितांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

वसुली विभागाची सध्या सातारा शहर आणि हद्दवाढ क्षेत्रात चतुर्थ वार्षिक पाहणी प्रक्रिया सुरू आहे या वार्षिक पाहणीच्या पाहणी पत्रकामध्ये मालक व भाडेकरू अशा दोन स्वतंत्र नोंदी करावयाचे असतात यामध्ये भाडेकरूंची नोंद न घेण्यासाठी शनिवार पेठेतील तक्रारदाराकडे सहस्त्रबुद्धे व कदम या दोघांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली . तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री एस एस राऊत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सायंकाळी पाच वाजता महसूल विभागाच्या दालनातच सापळा रचला व विनायक गोडबोले व प्रदीप ऊर्फ बाळू कदम या दोघांना पाच हजाराची लाच घेताना पकडले संबंधितांवर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

या संदर्भाच्या अनुषंगाने वसुली विभागाच्या काही कर्मचाऱ्यांकडे तसेच अधीक्षकांकडे ही कसून चौकशी करण्यात येत आहे सातारा पालिकेच्या ढिसाळ आणि खाऊ कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाला आहे दोन वर्षांपूर्वी आरोग्य विभागाचे काही कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली होती त्यानंतर वसुली विभाग एकदम कारवाई झाल्याने पालिका वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!