महिलांकडे एकटक पाहणे हादेखील विनयभंगच; सत्र न्यायालायाचा रोडरोमियोंना दणका


स्थैर्य, दि.१२: महिला आणि मुलींकडे एकटक पाहणाऱयांची आता खैर नाही. महिलांकडे एकटक पाहणे हासुध्दा विनयभंगच आहे असे स्पष्ट करत संभाजीनगर येथील सत्र न्यायालयाने एका रोडरोमियोला सहा महिने कैदेची शिक्षा ठोठाकली.

महिला आणि मुलींकडे एकटक पाहणाऱयांची समाजात कमी नाही. कुणीतरी आपल्याकडे एकटक पाहतोय हे कळूनही महिला आणि मुली कुणालाही न सांगता सहन करत असतात. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला हा त्रास असह्य झाला होता. 2017 मध्ये दामोदर राबडा हा रोडरोमियो ती मुलगी शाळेत जात असताना तिचा पाठलाग करायचा. तिच्या घरासमोरील बगिच्यामध्ये ती सायकल चालवत असतानाही तो सतत तिच्याकडे एकटक पाहत रहायचा. ती मुलगी तिच्या मामाच्या घरी गेली होती तिथेही हा रोडरोमियो पोहोचला होता. तिच्या मामाने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

संभाजीनगर पोलिसांनी या रोडरोमियोविरोधात ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याच्याविरुध्दच्या खटल्यात सहा साक्षीदार तपासले गेले. संभाजीनगरच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. राबडा याला सहा महिने सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा त्यांनी ठोठावली.


Back to top button
Don`t copy text!