फलटण शहरात ध्वनिक्षेपक आवाजाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा मंडळांवर कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२४ | फलटण |
गणेशोत्सव २०२४ च्या अनुषंगाने दि. ३१/०८/२०२४ रोजी फलटण तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांची बैठक घेऊन, गणेशोत्सवाचा आनंद समाजातील सर्व जनतेस आनंदाने घेण्यात यावा आणि सदर उत्सव शांतता, सलोख्याने, सामंजस्याने पार पाडावा, यासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापराच्या मार्गदर्शनासहित अन्य सूचना दिलेल्या होत्या. या पार्श्वभुमीवर दि. ०७/०९/२०२४ रोजी फलटण शहरात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अनेक गणेशोत्सव मंडळांनी श्रीगणेश मूर्तीच्या आगमनाप्रीत्यर्थ मिरवणुका काढल्या होत्या. या मिरवणुकांमध्ये खालील मंडळांनी ध्वनीक्षेपकाचा अनियंत्रितपणे वापर केल्याने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

  1. श्रीमंत जय श्रीराम गणेशोत्सव मंडळ, फलटण
  2. सोमवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ
  3. फलटण उमाजी नाईक चौक गणेशोत्सव मंडळ, फलटण
  4. दगडी चाळ गणेशोत्सव मंडळ, फलटण
  5. लक्ष्मीनगर येथील एकदंत गणेशोत्सव मंडळ, फलटण
  6. मोती चौक तालीम गणेशोत्सव मंडळ, फलटण
  7. छत्रपती शिवाजीनगर तालीम गणेशोत्सव मंडळ, फलटण
  8. सिध्दीविनायक महागणपती मंदिर गणेशोत्सव मंडळ
  9. बाल गणेश गणेशोत्सव मंडळ, फलटण
  10. अमर ज्योत मंडळ, फलटण

वरील मंडळांवर वरील कायद्याप्रमाणे कारवाई केल्याबरोबरच ध्वनीक्षेपकासाठी वापरण्यात येणारे ५ मिक्सर सेट ताब्यात घेतले आहेत.

ही कारवाई सपोनि नितीन शिंदे, पो.ह. चंद्रकांत धापते, सचिन जगताप, बापूराव धायगुडे, पोशि. मुकेश घोरपडे, महेश जगदाळे, सचिन पाटोळे, काकासो कर्णे, जितेंद्र टिके वगैरे यांनी केली.
,
आगामी कालावधीतही फलटण शहर पोलीस ठाण्याकडून कारवाई करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस ठाण्याकडून सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांना आवाहन करण्यात आले आहे की, गणेशोत्सवाचा आनंद सर्व जनतेस आनंदात व उत्साहात घेता यावा, जनतेस त्रास होणार नाही आणि परवानगीमध्ये दिलेल्या क्षमतेच्या मर्यादेपर्यंतच ध्वनिक्षेपकाचा आवाज नियंत्रित ठेवावा, गणेशोत्वाच्या निमित्ताने विधायक किंवा लोकोपयोगी आणि आदर्श घेण्याजोगे तसेच मंडळाचे नावलौकिक वाढविणारे उपक्रम राबवावेत.


Back to top button
Don`t copy text!