पत्नीला मारहाण प्रकरणी पतीवर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । सातारा । किरकोळ कारणावरुन पत्नीला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पती विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पूजा कांबळे रा. विकासनगर सातारा हिने तक्रार दिली आहे. तक्रारीनंतर पती शुभम सत्यवान कांबळे याच्याविरोधात दुखापत करण्याचा गुन्हा नोंद झाला आहे. मद्यप्राशन करुन आल्यानंतर मारहाण करण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास महिला पोलीस सूर्यवंशी या करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!