तडीपार गुंड गजाआड; शाहूपुरी पोलिसांची कारवाई

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०७ जून २०२२ । सातारा । जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार असलेल्या अट्टल घरफोडी करणाऱ्या गुंडाला शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिताफिने पकडले. रवी निळकंठ घाडगे वय २२ रा. सैदापूर, ता. सातारा असे पोलिसांनी पकडलेल्या गुंडाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एकपथक शनिवारी रात्री मोळाचा ओढा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी रवी घाडगे हा पोलिसांना दिसला. तो एका इमारतीच्या आडोशाला दडून बसला होता. पोलीस त्याच्याजवळ जाताच तो पळून जाऊ लागला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला शिताफिने पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तो सातारा जिल्ह्यातून तडीपार असतानाही तो मोळाचा ओढा येथे आल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्यावर तडीपारीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अभिजित यादव, पोलीस कॉस्टेबल हसन तडवी, लैलेश फडतरे, अमीतमाने, ओंकार यादव, सचिन पवार, स्वप्निल सावंत यांनी केली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!