जैन सोशल ग्रुपतर्फे १६ ऑगस्टला फलटणमध्ये महारक्तदान शिबिरांचे आयोजन

दैनिक स्थैर्य | दि. १३ ऑगस्ट २०२६ | फलटण |
भारतीय स्वातंत्र्य दिन व जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनच्या ‘फेडरेशन डे’च्या शुभमुहूर्तावर आंतरराष्ट्रीय अध्यक्ष बिरेनभाई शहा यांच्या प्रेरणेने देशभरात तब्बल ५०,००० रक्तबाटल्या संकलित करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. याच पवित्र संकल्पातून रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी फलटण शहरात भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराचे स्वरूप आणि तपशील :
दिनांक : रविवार, १६ ऑगस्ट
वेळ : सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत

प्रमुख ठिकाणे :

  1. श्री दत्त मंदिर (फलटण बसस्थानक परिसर)
  2. श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर (रविवार पेठ, फलटण)
  3. फलटण ब्लड बँक

    रक्तपेढी सहकार्य :
    फलटण ब्लड बँक

या महान कार्यात जैन सोशल ग्रुप,फलटण, लायन्स क्लब फलटण वेलनेस वॉरियर्स, संगिनी फोरम फलटण, फलटण एस.टी. आगार आणि श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर संस्था, फलटण यांनी एकत्र येऊन सहकार्याचा हात पुढे केला आहे.

फलटणच्या दानशूर आणि कर्तव्यदक्ष नागरिकांनी, तरुणांनी आणि माता-भगिनींनी या महायज्ञात आपला खारीचा वाटा उचलून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जैन सोशल ग्रुपने केले आहे.

Back to top button
Don`t copy text!