कु.अनुजा जाधव हीचा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशाबद्दल सत्कार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०४ जून २०२२ । वाई । मर्ढे गावचे रहिवासी व वाई तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी सरचिटणीस विजय जाधव यांची पुतणी कु.अनुजा जाधव हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अभियांत्रिकी सेवा विभागात दैदिप्यमान यश संपादन करून राज्यात महिलांमध्ये १३ वा क्रमांक पटकावला. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने हे उज्वल यश मिळवले हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

याबद्दल तिचा सत्कार करताना प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन श्री महेंद्रा अवघडे, शिक्षक संघाचे नेते सिद्धेश्वर पुस्तके सर, विजय जाधव, महेंद्र इथापे, दीपक वाघमारे, श्याम पवार,मनोज पिसाळ व वाई तालुका शिक्षक संघाचे पदाधिकारी यांनी केला व कार्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!