
दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२२ । कोल्हापूर । संभाजीराजेंची गाडी पाहताच शिवेंद्रसिंहराजेंनी ओव्हरटेक करून त्यांची भेट घेतली. स्वत: संभाजीराजेंनी याबाबत फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे. शिवाय त्यांच्या या भेटीनंतर खूपच आनंद झाल्याचे त्यांनी म्हंटले असून कोल्हापूर व सातारा छत्रपती घराण्याचे ॠणानुबंध असेच वृद्धींगत होत राहोत असेही त्यांनी म्हंटले आहे.
काय म्हंटले आहे संभाजीराजे यांनी यावर एक नजर – संभाजीराजेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, आज प्रवासादरम्यान आमचे बंधू छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अचानक भेट झाली. महामार्गावर असूनसुध्दा गाडी ओव्हरटेक करून त्यांनी भेट घेतली. आपुलकीने चौकशी केली याचा आनंद वाटला. कोल्हापूर व सातारा छत्रपती घराण्याचे ॠणानुबंध असेच वृद्धींगत राहोत अशी आई भवानी चरणी प्रार्थना. दरम्यान, दोघांच्या या अनोख्या भेटीनंतर एकच चर्चा सुरु आहे.