श्री संत रोहिदास महाराज जयंती सोहळ्याचे शनिवारी नवलबाई मंगल कार्यालयात आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २२ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
श्री संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटी, फलटण यांच्या वतीने श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती सोहळा शनिवार, दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी फलटणच्या मारवाड पेठेतील नवलबाई मंगल कार्यालयात साजरा होणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

शनिवारी सकाळी १० ते ११.३० हळदी-कुंकू समारंभ, १०.३० ते ११.३० श्री संत रोहिदास महाराज प्रतिमेचे पूजन व आरती सोहळा होणार असून यावेळी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमही होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते २ वाजेदरम्यान महाप्रसादाचे वाटप होणार आहे.

हे कार्यक्रम श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पुसेगावचे मठाधिपती प.पू. श्री महंत सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते व आमदार दीपक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सेवानिवृत्त डीवायएसपी सजन हंकारे तसेच मुंबई महानगरपालिकेचे उपप्रमुख अभियंता संजय सोनवणे, कोरेगाव कुमठेचे सरपंच संतोष चव्हाण, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, नेत्रतज्ज्ञ डॉ. विकास कुंभार, गणपतराव भोसले, मिलिंद नेवसे, नितीन गांधी, ज्ञानेश्वर भगत, गणेश डोईफोडे, युवा जनमतचे संपादक युवराज पवार, शशिकांत भोसले, यशवंत खलाटे, अजय माळवे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या सर्व कार्यक्रमांचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री संत रोहिदास चॅरिटेबल सोसायटीकडून करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!