
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑक्टोबर २०२३ | सातारा |
आंधळी (ता. माण) येथील दाम्पत्याचा चुलत भावानेच निर्घूण खून केल्याची घटना घडली आहे. संजय रामचंद्र पवार (वय ४९) व मनिषा संजय पवार (वय ४५) असे त्या दाम्पत्याचे नाव असून संजय पवार यांचा चुलत भाऊ आरोपी बापूराव शहाजी पवार याने हा खून पूर्ववैमनस्यातून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी बापूराव पवार यास ताब्यात घेतले आहे.
