दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑगस्ट २०२२ । फलटण । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. ९/०८/२०२२ ते दि. १७/०८/२०२२ या कालावधीत फलटण उपविभागामध्ये स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला. त्यामध्ये कु.ईश्वरी विजय खांडेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिंडवस्ती (साठे फाटा) या विद्यार्थिनीने इयत्ता ६ वी ते ८ वी या वयोगटामध्ये वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होऊन फलटण तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल व कु.तेजश्री (तेजस्वी) दादासो चव्हाण या विद्यार्थिनीने वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळविल्याबद्दल त्याचप्रमाणे कु.ज्ञानेश्वरी विजय खांडेकर या विद्यार्थीनिने इयत्ता ६ वी ते ८ वी या वयोगटामध्ये निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळवल्याबद्दल फलटण उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप,फलटणचे तहसीलदार समीर यादव साहेब, फलटणच्या गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे, फलटणच्या गटशिक्षणाधिकारी पठाण मॅडम, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बाल विकास प्रकल्प अधिकारी इंगळे,बरड बीटचे विस्तार अधिकारी मठपती , निंबळक केंद्राचे केंद्रप्रमुख दारासिंग निकाळजे साहेब, तालुका समूह साधन केंद्राच्या दमयंती कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तावरेनगर शाळेचे संजय भोसले सर यांनी केले या यशाबद्दल फलटण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती शहीन पठाण पं.स.फलटणचे बरड बीट चे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.चन्नया घाळय्या मठपती, गिरवी निंबळक केंद्राचे केंद्रप्रमुख दारासिंग निकाळजे, मिंडवस्ती (साठे फाटा) शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, साठे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ, पालक यांनी शाळेचे यशस्वी विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेच्या मुख्याध्यापिका शकुंतला पवार, शिक्षिका उषा काकडे , विजया धुमाळ, राजेश बोराटे, संजय बडे, ज्ञानेश्वर खेडकर, रमेश नायकोडे या सर्वांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थ, पालक,शाळेस, शाळेतील विद्यार्थ्यांना व मुख्याध्यापक,शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या.