करोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेचे सव्वा चार कोटी खर्च

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २८ : करोनाला रोखण्यासाठी सातारा जिह्यात जिल्हा परिषदेच्यावतीने आरोग्य विभागाच्यावतीने प्रयत्न सुरु आहेत. त्याकरता जिल्हा परिषदेने नियोजन समितीकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनासाठी 5 कोटी 79 लाख 58 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी 4 कोटी 30 लाख 15 हजार 603 रुपये इतका खर्च झाला असून 1 कोटी 49 लाख 42 हजार 397 रुपये शिल्लक आहेत. कोरोनाच्या लढाईत 97 लाख रुपये ही पीपीई किटसाठी खर्च झाले आहेत.

करोना जिह्यात आल्यापासून त्या विरोधात लढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पूर्णपणे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरता जिह्यातील 27  करोना केअर सेंटरवर सव्वा चार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. 11 हजार 340 जणांचे स्वॉब तपासणीसाठी घेण्यात आले. पूर्वी कोरोना टेस्टसाठी 4 हजार 500 रुपये खर्च येत होता. आता 2 हजार 200 रुपये येत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत  करोना   केअर सेंटरची देखरेख केली जाते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला जिल्हा नियोजन समितीकडून  करोना  प्रतिबंधक उपाययोजनासाठी 5 कोटी 79 लाख 58 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी 4 कोटी 30 लाख 15 हजार603 रुपये इतका खर्च झाला असून 1 कोटी 49 लाख 42 हजार 397 रुपये शिल्लक आहेत. पीपीई कीटसाठी 97 लाख 41 हजार, व्हीटीएस कीटसाटी 82 लाख 45 हजार, सॅनिटायझरसाठी 8 लाख 85 हजार, बॉडी बॅगसाठी 3 लाख 12 हजार, फेसशिल्डसाठी 2 लाख 56 हजार, थर्मा मीटरसाठी 34 लाख 26 हजार, डिजीटल पल्स ऑक्सीमीटरसाठी 6 लाख 68 हजार, एन  95 सह अन्य मास्कसाठी 6 लाख 68 हजार, एसटी भाडे 5 लाख 31 हजार, एसएमएस पॅकेज 8 लाख, महिला बचतगट 5 लाख 84 हजार, जिल्हा परिषद कॅन्टीनसाठी 3 लाख 97 हजार, झेडपी मुद्राणालयसाठी 9 लाख 71 हजार, सॉफ्टवेअर सिस्टिमसाठी 5 लाख, पोलिसांच्या शिटय़ा आणि ओळखपत्रासाठी 2 लाख 41 हजार, अधिकाऱयांचे इंधन 30 लाख, औषध व साहित्य खरेदीसाठी 23 लाख 62 हजार रुपये खर्च झाले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!