प्रत्येक ग्रामपंचायतीस १५ व्या वित्त आयोगातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदीची मान्यता जिल्हा परिषदेने द्यावी; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मागणी


स्थैर्य, फलटण, दि. ०७ : हॉस्पिटल किंवा घरगुती वापरासाठीच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. ऑक्सिजनची कमतरता भासू लागली तर तातडीच्या प्रसंगी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरद्वारे रुग्णास ऑक्सिजन दिला जावू शकतो. अश्या ह्या उपयुक्त असलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनची खरेदी करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस मान्यता देण्यात यावी अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्याकडे केलेली आहे.

सध्या फलटण सह माण व खटाव तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. तरी प्रत्येक गावामध्ये विलीगीकरण कक्ष सुरु करण्यात यावा. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीस १५ व्या वित्त आयोगातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनची खरेदी करण्याची मान्यता देण्यात यावी. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्याकडे मागणी केली. सदर मागणीचे पत्र भाजपाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, भटक्या विमुक्त जमाती सेलचे अध्यक्ष सुनील जाधव, लतीफ तांबोळी, स्वीय सहाय्यक राजेश शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!