झेल एज्युकेशनचा एमआयटी-डब्ल्यूपीयू, पुणेसोबत सहयोग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२३ । मुंबई । झेल एज्युकेशन या भारतातील आघाडीच्या फायनान्स व अकाऊंट्स एड-टेक व्यासपीठाने नुकतेच एमआयटी-डब्ल्यूपीयू वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या करारांतर्गत बी.कॉम पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एसीसीए प्रमाणन देण्यात येईल. झेल एज्युकेशनचे सह-संस्थापक व संचालक अनंत बेंगानी एमआयटी – डब्ल्यूपीयू वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेच्या डीन डॉ. गुंजीत कौर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या सहयोगांतर्गत झेल एज्युकेशन विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी अभ्यासक्रमासह एसीसीए प्रमाणन प्राप्त करण्यामध्ये साह्य करेल. हा सहयोगात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना फायनान्स व अकाऊंटिंगमध्ये सर्वसमावेशक शिक्षण आणि स्‍पर्धात्मक कौशल्य प्रदान करेल, ज्याअंतर्गत एसीसीए पात्रतेसाठी जवळपास ९ सवलती देण्यात येतील. विद्यार्थी अगोदर नावनोंदणी केल्यामुळे जलदपणे त्यांच्या व्यावसायिक करिअरमध्ये प्रगती करू शकतात, ज्यामुळे ते त्यांचे युनिव्हर्सिटी पदवी शिक्षण घेत असताना वेळ व प्रयत्न वाचवू शकतात.

झेल एज्युकेशनचे सह-संस्थापक व संचाक अनंत बेंगानी म्हणाले, ‘‘झेल एज्युकेशनमध्ये आमचा विद्यार्थ्यांना विशेषत: त्यांच्या करिअर विकासासंदर्भात योग्य मार्गदर्शन व मेन्टोरशीप प्रदान करण्यावर दृढ विश्वास आहे. हा सहयोग आमचे कौशल्य आणि एमआयटीच्या प्रतिष्ठित शैक्षणिक सर्वोत्तमतेला एकत्र करतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर अकाऊंटिंग व फायनान्समध्ये निपुण होण्याच्या अधिक संधी मिळतात.’’

एमआयटी- डब्ल्यूपीयू वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेच्या डीन डॉ. गुंजीत कौर म्हणाल्या, ‘‘जगभरातील १,००,००० हून अधिक माजी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या ४० वर्षांच्या संपन्न वारसासह एमआयटी-डब्ल्यूपीयूने या मिशनला अधिक दृढ करण्यासाठी झेलसोबत सहयोग केला आहे. हा सहयोग विद्यार्थ्यांना बी. कॉम (एसीसीए) पदवीसह उत्तम व्यावसायिक बनण्याची संधी देतो.’’

हा सामंजस्य करार नोंदणीकृत विद्यार्थ्यांना विविध मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्समधील अनुभवी फायनान्स व्यावसायिकांकडून नियमित मास्टरक्लासेसची सुविधा देखील देईल. हे मास्टरक्लासेस विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग तज्ञांकडून शिकण्यास, तसेच करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करण्याकरिता व्यावहारिक ज्ञान मिळवण्यास मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.


Back to top button
Don`t copy text!