युवराज सिंगची न्युट्रिशन हेल्थकेअर स्टार्टअप ‘वेलव्हर्स्ड’मध्ये गुंतवणूक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, ३० : भारताचा पहिला पूर्ण न्युट्रिशन ब्रँड वेलव्हर्स्ड (www.wellversed.in) ने नुकतीच दिग्गज क्रिकेटर आणि प्रसिद्ध उद्योजक युवराज सिंगसोबत प्री-सीरीज अ फेरी यशस्वीरित्या पूर्ण केली. तो यासाठी ३ वर्षे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पुढे आला असून हा व्यवसाय वाढवण्यासाठी फंडिंग टीमसोबत अधिक योगदान देत काम करेल. या फंडिंग फेरीतून वेलव्हर्स्डने १०० कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे.

वेलव्हर्स्डकडे ८ पौष्टिक घटकांची उत्पादने असून बाजारातील भागीदारीनुसार हा केटोजनिक आणि कमी कार्ब गटातील पहिल्या क्रमांकाच ब्रँड आहे. कंपनी दर महिन्याला ५०,००० उत्पादन युनिटची गरज पूर्ण करते. तसेच मागील वर्षी कंपनीने २५०% ची दमदार वृद्धी अनुभवली आहे.

वायडब्ल्यूसी व्हेंचर्सचे संस्थापक युवराज सिंह म्हणाले, ‘कॅन्सरसोबत माझा संघर्ष सुरू असताना एकूणच आरोग्यापसाठी उत्तम पौष्टिक घटकांचे महत्त्व मला कळाले. पौष्टिक घटक आणि खाद्यपदार्थांची वेलव्हर्स्डने नव्याने ‌व्याख्या व रचना केली आहे. माझ्यासाठी हा केवळ पौष्टिक घटकांसाठीचा ब्रँड नाही तर एकूणच न्युट्रिशन इकोसिस्टिममध्ये मूलभूत बदल करण्यासाठी तांत्रिक नूतनाविष्कार घडवणारा ब्रँड आहे. कंपनीच्या संस्थापकीय टीमची ऊर्जा, उत्साह आणि सखोल ज्ञानाने मी खूप प्रभावित आहे. ब्रँडचे हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन प्लॅन्स इतर स्पर्धात्मक ऑफरपेक्षा वेगळी आहेत. हा लवकरच एक जागतिक ब्रँड बनेल अशी मला खात्री आहे.’

वेलव्हर्स्डचे सीईओ आणि सह-संस्थापक आनन खुर्मा म्हणाले, ‘समाजात व्यापक प्रमाणावर बदल घडवून आणण्याचा आमच्या ब्रँडचा जो उद्देश आहे, त्याच्याशी युवराज सिंगचे व्यक्तीमत्त्व खूप साधर्म्य पावते. या भागीदारीने वेलव्हर्स्डला नव्या बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यास, तंत्रज्ञान अपग्रेड करण्यास तसेच कंपनीची पुरवठा साखळी तसेच आरअँडडी अधिक बळकट करण्यास मदत होईल. मेट्रोपोलिटन आणि टीअर१ शहरांमध्ये कंपनीची दमदार उपस्थिती आहे. तसेच टीअर २ शहरांमध्ये तसेच एकूणच नव्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये नजीकच्या भविष्यात वेगाने विस्तार करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. २०२१ च्या सुरुवातीस गुंतवणुकीची सीरीज-अ सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.’


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!