‘यपटीव्ही’ने आयपीएल २०२१च्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार मिळवले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.०७: यपटीव्ही या साऊथ-एशियन कंटेंटच्या जगातील अग्रेसर ओटीटी प्लॅटफॉर्मने जवळपास १०० देशांमध्ये विवो आयपीएल २०२१ च्या डिजिटल प्रसारणाचे हक्क अधिगृहित केले आहेत. यामुळे यपटीव्ही विवो आयपीएल २०२१ मधील ६० टी२० सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी तसेच त्याचा आनंद घेण्याकरिता जगभरातील चाहत्यांना मदत करेल.

यपटीव्ही ९ एप्रिल ते ३० मे २०२१ या कालावधीत विवो आयपीएल २०२१चे प्रसारण करेल. यपटीव्ही काँटिनेंटल युरोप, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण पूर्व आशिया (सिंगापूर व मलेशिया वगळता), मध्य व दक्षिण अमेरिका, मध्य आशिया, नेपाळ, भूतान आणि मालदीव या प्रदेशांमधील जवळपास १०० देशांमध्ये या रंगतदार सामान्यांचे प्रसारण करेल.

यपटीव्हीचे संस्थापक व सीईओ श्री उदय  रेड्‌डी म्हणाले, “जगभरात क्रिकेटची क्रेझ आहे. आयपीएल नेहमीच जगातील चाहत्यांसाठी बहुप्रतीक्षित व शक्तीशाली मालमत्ता ठरली आहे. विवो आयपीएल आता पुन्हा भारतात आले असून, चाहते मैदानाच्या अनुभवातून आनंद मिळवतील, अशी आम्हाला खात्री आहे. यपटीव्ही देशातील खेळाच्या वृद्धीसाठी वचनबद्ध आहे. क्रिकेटच्या सामर्थ्याने हे काम सुरु आहे. आमचे यूझर्स घरीच राहून त्यांचा आवडता खेळ रिअल टाइममध्ये पाहू शकतील.”


Back to top button
Don`t copy text!