संरक्षण स्वयंसेवक म्हणून तरुणांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । 14 मे 2025। सातारा । भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत पोर्टलद्वारे तरुणांनी माय भारत नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी स्वप्निल देशमुख यांनी केले आहे.

तरुणांना राष्ट्रीय कार्यात, विशेषतः आपत्कालीन परिस्थिती आणि संकटाच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सक्षम करण्याच्या एकत्रित प्रयत्नांचा एक भाग आहे. नैसर्गिक आपत्ती, अपघात, सार्वजनिक आपत्कालीन परिस्थिती आणि इतर अनपेक्षित परिस्थितीत नागरी प्रशासनाला पूरक ठरू शकणारी एक सुप्रशिक्षित, प्रतिसाद देणारी आणि लवचिक स्वयंसेवक दल तयार करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. तरी तरुणांनी https://mybharat.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी.


Back to top button
Don`t copy text!