तरुणांनी जागृत असणे गरजेचे : श्रीमंत रामराजे


दैनिक स्थैर्य | दि. 15 ऑगस्ट 2024 | फलटण | आज भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन आपल्या देशातील तरुणांमध्ये देश बदलण्याची क्षमता आहे. येणाऱ्या काळातील भविष्य तरुण पिढीवर अवलंबून आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यामागचा एक मुख्य हेतू आपल्या तरुणांना जागृत करणे हा आहे; असे मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी WhatsApp स्टेटस द्वारे व्यक्त केले आहे.

आगामी काळातील आव्हाने पेलण्याच्या जिद्दीला, एक समाज म्हणून आपल्या एकसंध प्रयत्नांना व लोकशाही मूल्यांना अधिक बळ देण्याचा निर्धार करूया. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन करत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा यावेळी श्रीमंत रामराजे यांनी दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!