दैनिक स्थैर्य । दि. १७ मार्च २०२३ । वडूज । पुरोगामी विचाराची बांधिलकी स्वीकारून सर्वसामान्य दलित, शोषित, कष्टकरी व शेतकरी यांना न्याय देण्याची भूमिका घेणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(.नेते मंत्री आठवले गट) यांच्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका अध्यक्ष म्हणून श्री कुणाल गडांकुश व संतोष भंडारे यांची सरचिटणीस पदी संतोष भंडारे यांचीही निवड झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये अत्यंत संयमी नेतृत्व म्हणून श्री कुणाल गडांकुश यांच्याकडे पाहिले जाते. गेली पंधरा वर्ष रिपब्लिकन पक्षाच्या वाटचाली सोबतच त्यांनी अनेकांना मानवता भावनेतून अर्थसहाय्य केलेले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी ते मनोभावे सेवा करत आहेत.छत्रपती शिवराय, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित समाजासाठी आपले आयुष्य खर्च केले आहे. त्यामुळे आपली नैतिक जबाबदारी म्हणून श्री गडांकुश हे खटाव तालुक्यामध्ये काम करत आहेत.
रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे. आगामी सातारा जिल्हा परिषद व खटाव -माण पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबतची आघाडी कायम करून रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा मिळावा. यासाठी ते प्राधान्य देणार असून शासकीय पातळीवर सर्वसामान्य घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी अध्यक्षपदाचा वापर केला जाईल. व्यक्ती म्हणून पक्षाचे खटाव तालुकाध्यक्ष जरी असलो तरी रिपब्लिकन पक्षाचे व घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते हेच अध्यक्ष असून मी कामकाज करतील.मी फक्त रिपब्लिकन पक्षाचा पाईक आहे. असेही त्यांनी निवडीनंतर नम्रपणे सांगितले.
रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते अशोक गायकवाड, संतोष तथा तात्यासाहेब गायकवाड, जिल्हा सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड, ज्येष्ठ नेते अशोक मदने व शैलेंद्र जाधव,शुभम रामुगडे, अजित नलवडे,युवा नेते मयुर बनसोडे, राजेंद्र जगताप, शंकर लोकरे, नाथा कंठे, अनिता तोरणे, जोशना सरतापे,योगेश हिरवे, अजित कंठे व भाजप सोशल मीडिया प्रमुख शेखर पाटोळे,अजित जगताप,तानाजीराव पवार तसेच अनेक मार्गदर्शक नेत्यांनी या निवडीचे स्वागत केले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वाटचालीमध्ये माजी खटाव तालुकाध्यक्ष श्री गणेश भोसले यांचे योगदान विसरता येणार नाही. पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. सर्व जाती धर्मातील लोकांचा सहभाग पक्षासाठी मोठे योगदान ठरणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.असे ही स्पष्ट केले आहे.