दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२२ । फलटण । माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा व सर्व सामान्यांचा फायदा व्हावा व आर्थिक स्थिती चांगली राहावी म्हणून स्वराज सहकारी पतसंस्थेची स्थापना केलेली होती. या पतसंस्थेच्या चेअरमन पदी अमरसिंह नाईक निंबाळकर तर व्हाईस चेअरमनपदी महादेव अलगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
स्वराज सहकारी पतसंस्थेच्या आयोजित मिटिंगमध्ये अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती एस.पी. कुलकर्णी होत्या. संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असून फलटण शहरासह गुणवरे ता.फलटण, चेंबूर (मुंबई) येथील शाखांचा विस्तार केला असून शेतकरी गोरगरीब नागरिकांमध्ये हक्काची पतसंस्था निर्माण करण्याचे काम खासदार निंबाळकरांनी केलेले आहे.
निवड सभेवेळी मनोज कांबळे, धनंजय आटोळे, काकासो कदम, धनंजय पवार, मगनदास महाडिक, नानासो मोहिते, रोहित नागटिळे, पोपट जगदाळे, सिराजभाई शेख, सौ. उषा घाडगे, सौ.रुक्मिणी करळे व संस्थेचे व्यवस्थापक वसंत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवनिर्वाचित चेअरमन व व्हॉइस चेअरमन आणि संचालक मंडळांचे अभिनंदन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सातारा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केले.