महामार्गावर अपघातात युवक ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । सातारा ।  पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर थांबलेल्या ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात युवक ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला.नितीन धर्मराज जाधव (रा.आनेवाडी,ता.सातारा). असे मृत युवकाचे नाव आहे.

मंगळवारी सकाळी रामकृष्णनगर गावच्या हद्दीत उड्डाणपुलावर एक ट्रक नादुरुस्त झाल्याने महामार्गावरच उभा होता.यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराला अंदाज न आल्याने दुचाकी जोरात जाऊन ट्रकवर आदळली.या अपघातात नितीन धर्मराज जाधव व चंद्रकांत शंकर फरांदे (दोघे रा .आनेवाडी,ता.सातारा) हे गंभीर जखमीं झाले.त्यांना उपचारासाठी सातारा येथे तात्काळ पाठविण्यात आले.यावेळी उपचारापूर्वीच नितीन जाधव याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे हवालदार विजय देसाई व उत्तम गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान,याचवेळी कराड-सातारा मार्गावर अतीत गावच्या हद्दीत दुसरा अपघात झाला.पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने धडक दिली.यामध्ये कारमधील महेंद्रकुमार आमीन,पुष्पांबेन पटेल,बबनदास पटेल व पार्वतीबेन पटेल हे जखमी झाले.त्यांना उपचारासाठी सातारा येथे दाखल करण्यात आले असून कारचे नुकसान झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!