दैनिक स्थैर्य | दि. २९ मे २०२३ | फलटण |
निंबळक (ता. फलटण) गावच्या हद्दीत निमजाई मंदिराजवळ गुणवरे ते निंबळक रस्त्यावर बुलेटवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात ठाकुरकी (ता. फलटण) येथील युवक ठार झाला. महेश ज्ञानदेव शेडगे असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
या अपघाताची अधिक माहिती अशी, निंबळक (ता. फलटण) गावच्या हद्दीत निमजाई मंदिराजवळ गुणवरे ते निंबळक रस्त्यावर दि. २७ मे २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजण्याच्या सुमारास महेश ज्ञानदेव शेडगे हा बुलेट गाडी घेऊन फलटणला जात असताना बुलेट गाडीचा ताबा सुटून झालेल्या अपघातात महेश शेडगे (रा. ठाकुरकी, ता. फलटण) या युवक ठार झाला.
या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सपोनी भोसले करत आहेत.