वाई येथील कृष्णा नदीच्या रामडोहात बुडून युवकाचा मृत्यू


दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । वाई । येथील कृष्णा नदीच्या पात्रात राम डोहात पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. विकास सदाशिव वैराट (वय २०) कोटावर रविवार पेठ असे या युवकाचे नाव आहे.

आज सकाळी काही युवक पोहायला गेले होते. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यातील एक जण पोहताना बुडाल्याचे इतर मित्रांना समजले. त्यांनी शोध घेतला मात्र त्यात त्यांना अपयश आले. याची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. कुटुंबीयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शोध मोहिम राबवण्यासाठी महाबळेश्वरच्या सह्याद्री ट्रेकर्स रेस्क्यू टीमला पाचारण केले. टीमने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर डोहात बुडालेल्या विकास सदाशिव वैराट (वय २०) या युवकाला बाहेर काढले असून डोहात बुडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची नोंद वाई पोलिसांत करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कृष्णकांत पवार करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!