
स्थैर्य, सातारा, दि.१९: फत्त्यापुर (ता.सातारा) येथे युवकाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.नितीन संजय लोहार (वय.२२) असे या युवकाचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नितीन लोहार हा युवक फत्त्यापुर येथे कुटुंबियांसोबत राहत होता.त्याला दारूचे व्यसन होते.गुरुवारी सकाळी तो घरातून बाहेर पडला होता.रविवारी दुपारी त्याने गावातीलच मोडा नावाच्या शिवारात असलेल्या विहिरीच्या सिमेंट काँक्रीटच्या कप्पीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची गावातील काही लोकांच्या निदर्शनास आले.याची माहिती त्यांनी वडील संजय शिवाजी लोहार व पोलीस पाटलांना दिली.घटनेची फिर्याद वडील संजय शिवाजी लोहार यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली असून त्यामध्ये नितीन लोहार याने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची म्हटले आहे.पुढील तपास सहाय्यक फौजदार भीमराव यादव करत आहेत.