युवा कवी अविनाश चव्हाण “संविधान मित्र” पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०९ जानेवारी २०२२ । फलटण । यावर्षात दुसरे साहित्य संमेलन नुकतेच खटाव तालुक्यातील वर्डी येथे संपन्न झाले. सदरील साहित्य संमेलनामध्ये युवा कवी अविनाश चव्हाण यांनी “संविधान मित्र” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संविधान, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

दुसरे संविधान साहित्य संमेलन यावर्षी वडी, ता. खटाव येथे संपन्न झाले आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मुधोजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार होते. तर उद्घाटक प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे तर संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अरुण शिंदे होते. तर कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध युवा कवी अविनाश चव्हाण हे होते.

युवा कवी अविनाश चव्हाण हे युवा कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. नुकतेच ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रित कवी होते. त्यांच्या कवितांची दखल सध्या सातारा जिल्ह्यानेच नव्हे सर्व महाराष्ट्राने घेतली आहे. त्यांनी अनेक साहित्य संमेलनासोबत कवी समेंलनामध्ये सहभाग नोंदवला आहे.


Back to top button
Don`t copy text!