युवा शेतकरी मैदानात यावा : अनिल ढोले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

सुलाई ऍग्रोचा शुभारंभ करताना श्रीमहंत सुंदरगिरी  महाराज, डॉ. सुरेश जाधव,
मोहनराव पाटील, अनिल ढोले, अर्जुन मोहिते, सुरेशशेठ जाधव.    (छाया :
संदीप डांगे)

स्थैर्य, पुसेगाव, दि.१३: ग्रामीण शेती आता पारंपारीक राहीली नसून तिला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. म्हणून नोकरीसाठी फिरत बसण्यापेक्षा युवकांनी शेतीच्या मैदानात उतरुन हाय-टेक शेती करण्याचे आवाहन कृषी उद्योजक अनिल ढोले यांनी केले. 

  पुसेगाव येथे सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांचे हस्ते सुलाई ऍग्रो सव्हिसेचा उद्घाटन समारंभ झाला. याप्रसंगी देवस्थानचे चेअरमन मोहनराव पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्थ सुरेशशेठ जाधव, रणधीरशेठ जाधव, नवनाथ फडतरे, मानाजी घाडगे, संतोष तारळकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, नितीन पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. 

व्यवहारज्ञान चळवळ उभारावी 

यावेळी बोलताना अनिल ढोले पुढे म्हणाले, शेती तंत्रज्ञान अवगत केल्याशिवाय किफायशीरपणा येत नाही. नुसते शेतीशिवाय मजा नाही, हे गाडीच्यापाठीमागे लिहून शेती होत नाही, कारण असे शेतकरी एकदाच मजा आणि आयुष्यभर सजा भोगताना दिसतात. आता युवा शेतकऱयांची व्यवहारज्ञानी चळवळ उभी राहीली जावी, सुलाई ऍग्रोच्या माध्यमातून संग्राम जाधव या युवकाचा प्रयत्न असाच असेल. 

सदरवेळी श्री महंत सुंदरगिरी महाराज, चेअरमन मोहनराव पाटील, हणमंतराव देशमुख, मच्छीद्रशेठ जाधव आदिंनी आपले विचार मांडले. प्रारंभी सुलाई ऍग्रोच्यावतीने दिलीपराव जाधव व नामदेवराव जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास मदनशेठ जाधव, रामचंद्र जाधव, लक्ष्मणराव जाधव, धनंजय क्षीरसागर, कला-वाणिजयचे प्राचार्य खरात, संजय क्षीरसागर, तात्या पवार, मनोज जगदाळे, सचिनशेठ देशमुख, प्रविणसाहेब जाधव, प्रशांत कुलकर्णी, उमेश शेडगे, संतोष जाधव, बाबूभाई माळी, दिलीप देशमुख, गिरीष कुलकर्णी, रामचंद्र माने, विशाल माने, विशाल जाधव, पंकज माने, महेंद्र कचरे, अण्णा जगदाळे, नितीनआप्पा जाधव, चंद्रकांत जाधव, शिवाजी जाधव इत्यादीसह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन चव्हाण तर मान्यवरांचे आभार संग्राम जाधव यांनी मानले. 

युवकांनी पुढे यावे 

आपल्या दररोजच्या जीवनात ज्याप्रमाणे मेडीकल स्टोव्हर्स महत्वाची आहेत, त्याचप्रमाणे आता शेतीच्या औषध दुकानाची गरज भासू लागली आहे. ग्रामीण भागातील युवकांनी शेतीक्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ. सुरेश जाधव यांनी व्यक्त केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!