शेतीला पाणी पाजताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ मे २०२२ । म्हसवड । म्हसवड पानमळा येथील ३२ वर्षीय शेतकरी रात्रीच्या दहा वाजता पती पत्नी मका पिकाला पाणी पाजत (दारेधरत) असताना वाफ्यातच ह्रदयविकाराच्या तिव्र धक्क्याने महेश गुलाब नामदे या तरुण आईवडिलांना एकुलता एक असलेल्या शेतकर्याचा मृत्य झाल्याची घटना नुकतीच म्हसवड येथे घडल्याने सर्वत्र हाळहाळ व्यक्त होत आहे

परवा रात्री म्हसवड शहरा पासून दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या पानमळा येथील अर्धग्यवायूने दोन वर्षं पासून अंथरूनावर झोप असलेल्या गुलाब नामदे यांना एकुलता एक महेश हा शिक्षीत मुलगा होता मात्र कुटुंब शेतकरी असल्याने आपल्या मुलाने हि शेती करत घराकडे लक्ष द्यावे या उद्देशाने महेश यांना शेती शिवाय पर्याय नव्हता दिड वर्षापूर्वी महेश यांच्या वडिलांनी नातवाच्या वाढदिवसाला सायकल भेट दिली होती त्या महेशच्या एकुलता एक मुलाला मोटार सायकल वरील युवकाने जोरदार धडक देवून त्या कुटुंबाचा वारस हि गेला होता या वडिलांच्या व मुलाच्या धक्यातुन महेश सावरत असताना काळाने कुटुंबाचा कर्त्या पुरुष असलेल्या महेश यांच्यावर हि झडप घालून नामदे परिवारास पोरके केल्याने अनेकांच्या डोळ्यात या घटनेने पाणी तळताना दिसत होते शासनाचे प्रतिनिधी असलेल्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी या नैसर्गिक मृत्यूने मयत झालेल्या महेश गुलाब नामदेे या कुटुंबाला शासनातर्फे जी मदत देता येईल ती लवकर देण्याची मागणी होत आहे


Back to top button
Don`t copy text!