दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२३ । बारामती । बारामती हाय टेक्स्टाईल पार्क मध्ये टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार व मार्गदर्शक अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पेपरमिंट कंपनी मध्ये जागतिक योग दिनानिमित्त (बुधवार २१ जून ) योग प्रात्याक्षिक व कर्मचाऱ्यांना मुलांना शालेय उपयोगी वस्तू चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी पेपर मिंट क्लोथिंग कंपनीचे संचालक संतोष कटारिया ,सुचिता कटारिया, आशिष कटारिया, महेश कटारिया, सुरेश भंडारी, श्रीमद राजचंद्र मिशन, व
योग महाविद्यालयाचे योगगुरु डॉ.निलेश महाजन, सौ.महाजन मॅडम,नीलिमा झारगड, सोनाली ठवरे,प्रीती शिंदे,स्वाती घुले, अण्णा ढमे,अनिल वाघ व कंपनीचे व्यवस्थापक शरद शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी कंपनी मधील ५०० स्त्री पुरुष कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.योगाचे जीवनातील महत्व व निरोगी आयुष्य या विषयावर निलेश महाजन यांनी माहिती देऊन दैनंदिन जीवनात योगासने कशी करावीत या बदल प्रात्याक्षिक दाखविले व कर्मचारी वर्गाकडून करून घेतली. धर्मपुर गुजरात यांच्याकडून बनवून घेतलेल्या स्कूल बॅग व कर्मचाऱ्यांच्या मुलांना लागणारे शालेय साहित्य याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेपरमिंट कंपनीचे व्यवस्थापक शरद शिंगाडे आणि त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली.