
दैनिक स्थैर्य । 23 जून 2025 । फलटण ।दालवडी ता. फलटण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कृषीदूतांतर्फे योगाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी केंद्र प्रमुख हणमंतराव जगताप, मुख्याद्यापक इंद्रजीत सस्ते, प्रा.संतोष बनकर, प्रा. अजय शिंदे, प्रा. मुलाणी तसेच कृषीदूत आदर्श पाटील, ओंकार साळुंखे, सुशांत भोसले, विनायक कांबळे, अभिजीत यादव, आदित्य पवार, प्रतिक सुर्वे उपस्थिती होती.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, प्रा.नीतिषा पंडित, यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.