दैनिक स्थैर्य | दि. २८ एप्रिल २०२४ | फलटण |
श्री क्षेत्र किल्ले वारुगड येथे श्री भैरवनाथ देवाची भव्य यात्रा महोत्सव बुधवार, दि. १ मे २०२४ ते ४ मे २०२४ पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.
पंचमी सोमवार, दि. २९ एप्रिल २०२४ सायं. ५ वाजून ५ मिनिटांनी श्री भैरवनाथ व जोगूबाई देवाचा हळदी समारंभ कालाष्टमी बुधवार, दि. १ मे २०२४ रात्री ९.४५ ते रात्री ११ वाजेपर्यंत श्री भैरवनाथ व जोगुबाई देवाचा लग्न (विवाह) सोहळा संपन्न होईल.
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींचा सत्कार समारंभ होईल. त्यानंतर ग्रामस्थांची वार्षिक मीटिंग सभा होईल.
नवमी गुरुवार, दि. २ मे २०२४ रोजी दुपारी १२ ते २ पर्यंत देवांची पालखीतून मिरवणूक दाडपट्टा व कसरतीचे खेळ होतील. वारुगड पंचक्रोशीतील संगीत भजन मंडळाचे कार्यक्रम होतील व भेदिक गाण्याचे सामने होतील. (शक्ती तुरा) रात्री १० ते ३ पर्यंत सौ. आशाताई तरडगावकर व सौ. उषाताई सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशा होईल. दशमी शुक्रवार, दि. ३ मे २०२४ दुपारी १२ ते २ देवाची पालखीतून मिरवणूक, दांडपट्टा व कसरतीचे खेळ होतील व नंतर काठीची बकरी पडतील.
दुपारी २ ते ७ पर्यंत गझी लेझीम यांचे भव्य सामने होतील. त्यात पांढरवाडी, आंधळी, बोडके, कोळेवाडी, तोडले, मोगराळे व पंचक्रोशीतील लेझीम मंडळ भाग घेतील आणि भेदिक गाण्याचे सामने होतील. रात्री १० ते ३ पर्यंत राष्ट्रपती सुवर्णपदक विजेती स्व. विठाबाई नारायणगावकर यांची रत्नकन्या सौ. मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ नारायणगावकर यांचा कार्यक्रम होईल.
एकादशी शनिवार, सकाळी ६ वा. छबिना निघेल व परत ९.३० वाजता परत येईल व त्याचवेळी तमाशाचा मुजरा व वावरहिरे, पांढरे यांचा कार्यक्रम होईल. दुपारी ११ ते १ पर्यंत किल्ल्यावर झेंडा नेण्याचा कार्यक्रम होईल व भेदिक गाण्याचे सामने होतील. दुपारी ३ ते ७ किल्ले वारुगड केसरी निकाली कुस्त्यांचे जंगी सामने होतील. ७५ प्रेक्षणीय कुस्त्यांच्या लढती होतील.
यात्रेसाठी मुंबई, परळ, पनवेल, कल्याण, वसई, ठाणे, भाईदर, एस. टी. डेपोने यात्रेसाठी जादा गाड्या सोडल्या असून यात्रेकरूंसाठी लाऊड स्पीकर डेकोरेशन आणि उपहारगृहासाठी व यात्रेकरूंसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे.
सर्व भाविक बंधू-भगिनींनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेऊन यात्रेची शोभा वाढवण्याचे आवाहन वारूगड ग्रामपंचायत यात्रा कमिटीने केले आहे.