मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा


दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑगस्ट २०२२ । पुणे । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.

पूजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,उपविभागीय अधिकारी सारंग कोडीलकर, कार्यकारी विश्वस्त तथा तहसिलदार वैशाली वाघमारे, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे, कार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, संतोष गवांदे आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!